मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकनाथ खडसे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या भाषणात खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरली आहे. त्यामुळे खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.
या प्रकरणी आता एकनाथ खडसेंची पोलीस चौकशी होणार आहे. ओरिजनल व्हिडीओ तपासून जळगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करणार अशी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी दिली आहे.
COMMENTS