माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भोसरी जमीन प्रकरणी सुरु असलेली न्यायालयीन चौकशीचा अहवाल 31 मार्चला म्हणजेच येत्या 2 दिवसात अपेक्षित आहे.
भोसरीच्या MIDC मधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी झोटिंग समितीला देण्यात आलेली चौकशीची मुदत 31 मार्चला संपत आहे. भोसरी midc जमीन गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. न्यायालयीन चौकशी समिती व्यतिरिक्त लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत ही चौकशी होणार आहे. झोटिंग समितीची मुदत 31 मार्च 2017 ला संपत असून भोसरीच्या MIDC मधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अहवाल मिळणे अपेक्षित आहे.
COMMENTS