जालना: शेतक-यांकडे मोबाइल शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाफराबाद न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.
‘शेतक-यांकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत; परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाही.’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे शेतक-यांचा अवमान झाला म्हणून त्यांच्या विरोधात जाफराबाद येथील काँग्रेस कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी जाफराबाद न्यायालयात हजर राहिले. अॅड. रामेश्वर अंभोरे यांच्यामार्फत जामीनअर्ज दाखल केला. 15 हजारांच्या जमानत रकमेवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
COMMENTS