एटीएम (ATM) ला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. एटीएमचा शोध जॉन शेफ़र्ड-बैरन यांनी लावला आहे. एटीएम मशीन तयार करणारे जॉन शेफ़र्ड-बैरन यांचा जन्म भारतामध्ये झाला. बैरनचा जन्म 23 जून 1925 रोजी शिलॉंगमध्ये झाला होता.
1967 मध्ये जगातील पहिल्या एटीएम मशीन लंडनमध्ये एका बँकमध्ये ठेवण्यात आली होती. टीव्ही मालिका ‘ऑन द बॉसज’ च्या रेग वार्ने एनफ़ील्ड हे बारक्लेज़ बँक मधून पैसे काढणारे पाहिले व्यक्ती होते. त्यांना त्यावेळी ‘होल इन द वॉल’ असे म्हटले जात होते.
व्हिक्टोरिया क्लेँडस म्हणाले की, कागदी नोटा आणि चिल्लर नाणी याचा वापर जरी कमी होत असला तरी भविष्यात बँकांना यांची गऱज भासणार आहे. ब्रिटनमध्ये अजुनही 94 टक्के युवा आणि प्रौढ कॅश वापर करतात.
लंडन एन्फिल्डमध्ये 50 वर्षांपूर्वी 27 जून 1967 मध्ये जगातील पहिल्या एटीएम मशीन बार्कलेझ बँकेच्या शाखामध्ये उघडण्यात आले होते. सुवर्ण जयंती निमित्त बँकेने सोन्याचे ATM मशीन बनवण्यात आले आहे.
बार्क्लेमध्ये कस्टमर एक्स्पिरिएन्सचे प्रमुख हॉल अहमद म्हणतात की, “अलिकडे डिजिटल बँकिंग आणि कार्डद्वारे व्यवहार होत असतील तरी आज ही रोजच्या खरेदी- विक्रीसाठी कागदी पैशांची गरज आहे. ते म्हणाले, “सर्वात पहिली कॅश मशीन बनविण्यात बार्क्लेज़ची भूमिका मुख्य होती याचा आम्हाला आनंद आहे.”
COMMENTS