एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नाव घोषणा आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी घोषणा केली. भाजप मुख्यालयात संसदीय बोर्डाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह पदाधिकार ही उपस्थित होते.
उपराष्ट्रपतीपदासाठी 5 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 जुलै आहे. तर अर्ज मागे घ्यायची तारीख 21 जुलै आहे. यूपीएनं उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
COMMENTS