मुंबई – ‘एनडीए’ चा राष्ट्रपतीपदाचे उमेदवारावर रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिवसेनेनेे प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. ‘केवळ दलितांच्या मतावर डोळा ठेवून भाजपनं कोविंद यांच्या नावाची घोषणा केली असून, मतांसाठी हे राजकारण चुकीचं आहे’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त आज षणमुखानंद सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना लपून छपून भूमिका घेत नाही, राष्ट्रपती पदाबाबत आम्ही उद्या भूमिका घेऊ, ‘चुनवी जुमला’ शिवसेना करत नाही, देशात अनेक ठिकाणी विविध कायदे आहेत. समान नागरी कायदा करण्यासाठी काहीतरी ठोस करण्याची आवश्यकता आहे. याच भूमिकेतून आम्ही मोहन भागवत यांच्या नावाची शिफारस केली होती, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
COMMENTS