माजी राष्ट्रपती एपीजे अब्दल कलाम यांच्या स्मारकावरु तामिळनाडूमध्ये सध्या जोरदार वादंग उठलं आहे. रामेश्वरमध्ये उभारण्यात आलेल्या या स्मारकात ज्या ठिकाणी कलाम यांचं शिल्प उभारण्यात आलं आहे. तिथे गीतेतील श्लोक कोरण्यात आले आहेत. त्याला तामिळनाडूमधील अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. तसंच कलाम यांचे कुटुंबियही या प्रकरणावरुन नाराज असल्याचं समतंय. एकतर त्यांच्या शिल्पाजपळ कुठलेही धार्मिक ओळी नकोत. जर ठेवायच्याच असतील तर सर्व धर्मातील ठेवाव्यात अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे.
या शिल्पाजवळ गीतेतील श्लोक ठेवणे म्हणजे त्यांना हिंदुत्ववादी बनवण्याचा प्रयत्न असल्याची टीका डीएकेचे नेते एम के स्टॅलिन यांनी केली आहे. त्यांच्या शिल्पाजवळ तामिळमधील तिरुक्करल हा ग्रंथ का ठेवला नाही असा सवाही त्यांनी केला आहे. या ग्रंथाला कलाम खूप मानायचे. त्यामुळे हे वादग्रस्त श्लोत तिथून हटवावेत अशी मागणीही अनेक नेत्यांनी केली आहे. कलाम यांना सर्व धर्माचा सारखाच आदर होता. त्यामुळे त्यांना कुठल्या एका धर्मात अडकवणं योग्य नाही असंही प्रतिक्रिया उमटत आहेत.
COMMENTS