एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्याचा हल्ला

एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्याचा हल्ला

नवी दिल्ली – एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवीसी यांच्यावर आज दिल्लीत संसदेच्या परिसरात शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने हल्ला केला. आज दुपारी संसदेच्या परिसरात हा प्रकार घडला. हल्लेखोर कार्यकर्त्यानेच फोन करुन प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. संसदेच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार रेकॉर्ड झाल्याचाही त्याचा दावा आहे. ओवेसी यांनी आपल्याला उलट सुलट उत्तरे दिली त्यामुळे आपण त्यांना मारले असंही हल्लेखोराचं म्हणणं आहे. नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे आपण समर्थक असल्याचंही त्याचं म्हणणं आहे. माझ्या या कृत्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आंनच होईल असंही हल्लेखोराने म्हटले आहे. हल्लेखोराने ओवेसींना काय विचारले हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

COMMENTS