एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांना 2 तासांसाठी जामीन !

एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांना 2 तासांसाठी जामीन !

नांदेड – एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदान करण्यासाठी दोन तासाचा जामीन मिळाला आहे. त्यामुळे मोईन यांनी जुन्या नांदेडमधील हतई परिसरात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. नांदेड महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत हाणामारी झाली होती. त्या प्रकरणात त्यांना अटक झाली असून मोईन सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मतदान करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने त्यांना दोन तासांचा जामीन दिला होता.

COMMENTS