मुंबई – प्रवाशांच्या आणि कर्मच्याऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक आगार व बसस्थानकावर CCTV कँमेरे बसविले जाणार आहेत. या माध्यमातून बसस्थानक व आगार परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ” सावध रहा ” मोहिम सुरू करण्यात येणार आहे. बसस्थानकावरील वर्दळीचा गैरफायदा घेऊन पाकीटमार, किरकोळ चोऱ्या, महिलांची छेडछाड अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर CCTV कँमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. तसेच आगारातील कायॆशाळेत व परिसरात कमॆचाऱ्यांच्या विशेषत: महिला कमॆचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कँमेरे बसविणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यापैकी एक कँमेरा थेट आगार व्यवस्थापकांच्या (डेपो मँनेजर) कायाॆलयात बसविण्यात येणार असल्यामुळे तेथील कामकाजाची माहिती वरिष्ट कायाॆलयापयॆंत सहज पोहोचणे शक्य होणार आहे. या CCTV कँमेर्यांवर दैनंदिन नजर. ठेवण्याची जबाबदारी एसटीच्या सुरक्ष विभागावर सोपविण्यात आली असून आक्षेपहायॆ घटनेची माहिती या विभागामाफॆत त्वरित वरिष्टांकडे कळविण्याची सोय करण्यात आली आहे. दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या 281 व्या बैठकित या योजनेला मान्यता देण्यात आली. लवकरच CCTV कँमेरे बसविण्यात सुरूवात करण्यात येणार आहे.
COMMENTS