ऐकावं ते नवलचं, मालेगाव महापालिका निवडणुकीत ड्रोनचा वापर होणार !

ऐकावं ते नवलचं, मालेगाव महापालिका निवडणुकीत ड्रोनचा वापर होणार !

नाशिक – मालेगाव महापालिकेसह, भिवंडी निजामपूर आणि पनवेल महापालिकेची उद्या निवडणुक होत आहे. मालेगाव महापालिकेच्या या निवडणुकीत आता ड्रोनचा वापर होणार आहे. निवडणुकीदरम्यान चार ड्रोन कॅमेरे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवणार आहेत. संवेदनशील भागात प्रशासनाकडून ड्रोनचा वापर होणार आहे. अशा प्रकारे कुठल्या निवडणुकीसाठी ड्रोनचा वापर होण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. मतदानादरम्यान कुठे गडबड गोंधळ होऊ नये, कुणी पैशाचं वाटप करु नये, आणि इतर गैरप्रकार होऊ नये यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. आता मग फक्त मालेगावमध्येच ड्रोनचा प्रयोग का असा प्रश्न पडतोय. भिवंडी निजामपूर आणि पनवेल महापालिकेतही संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. मग या दोन ठिकाणी ड्रोनचा वापर का केला जात नाही हाही प्रश्न पडतोच.

COMMENTS