फ्लिककार्ट अमेझॉनवर वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरीचा म्हणजेच वस्तू घरी आल्यानंतर पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय आता रेल्वेनेही उपलब्ध करून दिलाय. म्हणजेच तुम्ही रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बुक करा, आणि तिकीट घरी आल्यानंतर त्याचे पैसे द्या हा पर्याय सुरू करण्यात आलेला आहे. मात्र यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे मोजावे लागतील.
आयआरसीटीसी ने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही सेवा प्रायोगिक तत्वावर 600 शहरांमध्ये सुरू करणार असल्याचं आयआरसीटीसीने जाहीर केलं आहे. ही सेवा घ्यायची असल्यासं पॅन कार्ड किंवा आधार कार्डाच्या सहाय्याने तुम्हाला नोंदणी करावी लागले, त्यानंतर तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर किंवा अॅपवर कितीही वेळा तिकीट नोंदवू शकता. तुमच्या तिकीटाची रक्कम 5 हजाराच्या आत असेल तर तुम्हाला त्यासाठी 90 रूपये अधिकचे मोजावे लागतील. तिकीटाची रक्कम 5 हजारापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला 120 रूपये जास्त मोजावे लागतील.हे तिकीट तुम्हाला प्रवासाच्या आधी पाच दिवस नोंदवावं लागेल असं आयआरसीटीसीने सांगितले आहे.
COMMENTS