औरंगाबाद महापालिकेत राडा, एमआयएमने राजदंड पळवला, शिवसेनेचाही गोंधळ !

औरंगाबाद महापालिकेत राडा, एमआयएमने राजदंड पळवला, शिवसेनेचाही गोंधळ !

औरंगाबाद महापालिकेची आज सर्वसाधरण सभा होती. यामध्ये मध्ये एमआयएमच्या नगरसवेकांनी चांगलाच राडा केला. महापालिकेतील काही भाजपचे नगरसेवक आणि अधिकारी चीनच्या दौ-यावर जाणार आहेत. त्या दौ-याला एमआयएमचा विरोध आहे. त्यामुळे एमआयएमच्या नगरसवेकांनी या दौ-याला विरोध करत गोंधळ घातला.  महापौरांचा राजदंड पळवला. तसंच महापालिकेच्या आवारात चीनचा झेंडाही जाळला. एमआएएमसह सर्वच विरोधी पक्षांनी या दौ-याला विरोध केला आहे.

आजच्या सभेत शिवसेनेच्या नगरवेकांनीही गोंधळ घातला. शहरातील रस्त्यांसाठी सरकारने महापालिकेला 100 कोटी रुपये दिले आहेत. त्याचं अभिनंदन भाजपच्या सदस्यांनी केलं. आपल्याला विश्वासात न घेता भाजपनं हा प्रकार केल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक सभागगृहातून निघून गेले.

COMMENTS