चेन्नई – प्रसिद्ध चित्रपट अभिनेते कमल हसन यांच्या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. कट्टर हिंदुत्ववादीही आता हिंसक कारवाया करत असल्याचं विधान कमल हसन यांनी केलं आहे. या विधानावर भाजपनं तीव्र प्रतिक्रया दिली आहे. कमल हसन यांनी माफी मागावी असी मागणी पक्षानं केली आहे.
कमल हसन यांनी आनंदा विकटन या तामिळ साप्ताहिकात एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्वी हिंदुत्वावादी संघटना कोणत्याही प्रश्नावर चर्चेतून मार्ग काढत असतं. मात्र हल्ली त्यांचा चर्चेवर विश्वास राहिलेला नाही. ते हिंसक कारवाया करत आहेत. यावर भाजपनं तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय कमल हसन यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणीही भाजपने केली आहे.
COMMENTS