कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चा आवाज !

कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चा आवाज !

कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ ही घोषणा दिल्यास लोकप्रतिनिधींचं पद रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारने दिला होता. कन्नड मंत्र्याच्या उद्दामपणाला आज मनसेने चांगलाचं दणका दिला आहे. कर्नाटक राज्य परिवहनच्या बसवर मनसे कार्यकत्यांनी  ‘जय महाराष्ट्र’ असं ठळक अक्षरात लिहून पाठवलं आहे.

मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून केला जात आहे.  ‘बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे ‘जय महाराष्ट्र’ हे शब्द  उच्चारण्यावर बंदी घालू, सार्वजनिक कार्यक्रमात किंवा अधिवेशन काळात कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ‘जय महाराष्ट्र’चा उच्चार केल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद रद्द केलं जाईल. ‘ अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती.  त्याला प्रतिउत्तर म्हणून ठाण्यात शहर अध्यक्ष श्री.अविनाश जाधव यांनी कर्नाटक राज्य परिवहनच्या बसेसवर ठळक अक्षरांत ‘जय महाराष्ट्र’ हे शब्द लिहून त्या बस कर्नाटकला रवाना केल्या आहेत.

COMMENTS