मुंबई – महापालिकेत संख्याबळ वाढवण्यासाठी करोडो रुपये देऊन शिवसेनेने नगरसेवक विकत घेतले आहे. सेनेची ही भूमिका लोकशाहीला मारक असून याबाबत त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी याबाबतचे निवेदन राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने आणि कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहे.
सोमय्या यांच्या या तक्रारीने शिवसेना आणि भाजपमधील वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. आता केवळ भाजप एका नगरसेवकाने मागे असून लवकरच मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान होईल, असे वक्तव्य सोमय्या केले होते. दरम्यान सोमय्या यांनी शिवसेनेकडून कोणत्या नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला याची माहिती दिली नाही. माझ्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास त्यांच्यापुढे माहिती सादर करणार, अशी भूमिका सोमय्या यांनी घेतली आहे.
COMMENTS