ब्रेकिंग न्यूज – कर्जमाफीचा निर्णय येत्या मंगळवारी – चंद्रकांत दादा पाटील

ब्रेकिंग न्यूज – कर्जमाफीचा निर्णय येत्या मंगळवारी – चंद्रकांत दादा पाटील

मुंबई – कर्जमाफीचा निर्णय येत्या मंगळावरच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाणार आहे. अशी माहिती यांसदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे. या कर्जमाफीचा राज्यातल्या 91 लाख शेतक-यांना फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांतील नेत्यांनाही या कर्जमाफीच्या प्रश्नावरुन समाधानी करण्याचा प्रय़त्न केल्याचंही चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं. सर्व पक्षांच्या नेत्यांच्या सूचना ऐकून अंतिम प्रमोज केल्याचंही त्यांनी सांगितलं. चंद्रकांत दादा पाटील यांनी 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफीचे संकेत दिले आहेत. त्याला राजू शेट्टी यांनी जोरदार विरोध केला आहे. कमीत कमी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यात आता शेतकरी सूकाणू समिती 1 लाख रुपायंच्या कर्जमाफीबाबत काय भूमिका घेते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS