कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी सुकाणू समितीचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक झाली मात्र या बैठक कोणातही तोडगा निघाला नाही . शेतक-यांची सरसकट कर्जमाफीची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जाचक अटी रद्द करण्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य ठाम राहिले.
मात्र यावर सरकारकडून मागण्या मान्य करण्यात आल्या नसल्याने नाराज शेतकरी नेते मंत्र्यांची पत्रकार परिषद सुरु असतांना शेतकरी संघटना बाजुच्या दालनातून घोषणा देत बाहेर पडले.
दरम्यान, खरीप हंगामासाठी तात्काळ 10 हजार रुपये मदत करण्याबाबतच्या जीआरमध्ये सुधारणा करण्यास सरकार सकारात्मक असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुकाणू समितीच्या सदस्यांना जाचक अटी शिथील करण्याबाबत सूचना करणार असल्याचंही ते म्हणाले. चर्चेच्या दुसऱ्या फेरीत शेतकरी प्रतिनिधी ‘सरसकट’वर ठाम होते, तर थकीत शब्द वगळण्यावर आग्रही होते. कर्जमाफीबाबत सरकारचा अभ्यास झालेला आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं .
पत्रकार परिषद सुरु असतांना शेतकरी संघटना घोषणा देत दुस-या दालनातून बाहेर पडले. सह्याद्री अतिथि गृहाच्या बाहेर घोषणा बाजी देत 10 हजारांच्या मदतीच्या अध्यादेशाची प्रत जाळली.
COMMENTS