कर्जमाफीबद्दल भलतेच स्टेटमेंट करणं ही भाजपची फॅशन, अशोक चव्हाणांचा नायडूंना टोला

कर्जमाफीबद्दल भलतेच स्टेटमेंट करणं ही भाजपची फॅशन, अशोक चव्हाणांचा नायडूंना टोला

मुंबई –  कर्जमाफी ही सध्या फॅशन झाली आहे. या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यावर सर्वच स्तरातून चौफेर टीका होत आहे. विरोधकांसोबत मित्र पक्ष शिवसेनेनंही नायडूंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कर्जमाफीबद्दल भलतेच स्टेटमेंट करणे ही भाजप नेत्यांची फॅशन झाली आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नायडू यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून नायडू यांनी ही फॅशन घेतलेली दिसते असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. देशभरात इतर राज्य सरकारे कर्जमाफी करत असताना राज्यात ती लागू करण्यास राज्य सरकार दिरंगाई का करत आहे ? हा खरा प्रश्न आहे असंही चव्हाण म्हणाले.

नायडूंचे वक्तव्य दुर्दैवी – रावते

ज्यांच्यामुळेच केंद्रात सत्ता मिळाली अशा शेतकऱ्यांना हमीभाव न देता,  बाहेरून शेतमाल आयात करणा-या केंद्र सरकारमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून असे वक्तव्य होणे हे दुर्देवी आहे. जे पाऊल कर्जमाफीबद्दल महाराष्ट्र सरकारने उचलले त्याचा एकप्रकारे हा अपमान आहे, असा टोला शिवेसेना नेते दिवाकर रावते यांनी लगावला आहे.

 

COMMENTS