मुंबई – मध्यवधी निवडणुकीबाबत भाजप आणि शिवसेना जे वक्तव्य करत आहे ते गांभीर्याने घ्यायची गरज नाही असं असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक केलंय. केवळ कर्जमाफीवरुन दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी सत्ताधा-यांकडून अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केलाय. मध्यवधी निवडणुका होण्याची अजिबात शक्यता नाही, कारण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाण्याची हिंमत नाही असंही ते म्हणाले. जेव्हा निवडणुका व्हायच्या त्या होऊ देत, काँग्रेस पक्ष त्याला तयार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
COMMENTS