कर्जमाफीसाठी ध्वजखांबावर चढून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कर्जमाफीसाठी ध्वजखांबावर चढून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवनात विरोधक आक्रमक झाले असताना इकडे साताऱ्यात एका शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ध्वजखांबावर चढून आत्मधहनाचा इशारा दिला. याप्रकारामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी हा शेतकरी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन करत होता. आपल्या मागण्यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा शेतकरी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ध्वजखांबावर हातात रॉकेलची बाटली घेवून चढला आणि त्याने आत्मदहनाचा इशारा दिला. सर्वजण स्वार्थी आहेत शेतकर्यांचे कर्ज माफ करा, बैलगाडी शर्यत पुन्हा चालू करा, जिवाचे बरे वाईट झाले तरी राष्ट्रध्वजाला ठेच लागू देनार नाही. अशी घोषणाबाजी करत त्याने आत्मदहनाचा इशारा दिला. त्यावेळी त्या शेतकऱ्याला खाली उतरवताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.

COMMENTS