मुंबई – शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी येत्या 22 तारखेपासून राजु शेट्टींची आत्मक्लेश यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेमध्ये राजु शेट्टी यांच्यासोबत हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. शेतक-यांना कर्जमाफी मिळावी आणि रंगनाथन आयोगाच्याय शिफारशीं लागू कराव्यात या मागण्यांसाठी ही आत्मक्लेश यात्रा काढण्यात येत आहे. विशेष म्हणजे पुण्यापासून मंबई पर्यंतचा संपूर्ण प्रवास हा चालत पार केला जाणार आहे. त्यामुळे ही यात्रा तब्बल 9 दिवस चालणार आहे. शेतक-यांबद्दल दिलेली आश्वासने सकारने 3 वर्षात पूर्ण केली नाहीत असा आरोपही शेट्टी यांनी केलाय. यापुढे भाजपसोबत राहिचे की नाही याबाबतचा निर्णय पक्षाची कार्यकारणी घेईल असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
असा असेल यात्रेचा कार्यक्रम —–
२२ मे
सकाळी ९.०० वा फुले वाडा पुणे प्रस्थान – मार्गे दगडूशेठ हलवाई गणपती , शनिवार वाड़ा – शिवाजीनगर बस स्थानक – साखर संकुल भूयार मार्गे वाकडेेवाडी – दुपारचे जेवण ऑल सेंट चर्च हायस्कूल. रात्री जेवण व मुक्काम आकुर्डि खांडोबाचा माळ.
******
२३ मे
दुपारचे जेवण आमरदेवी , देहु रोड महामार्ग रात्री जेवण पूजा गार्डन , वड़गाव मावळ.
*******
२४ मे
दुपारचे जेवण घाट रस्ता (१० की मि मुक्काम स्थळ) रात्री जेवण व मुक्काम तुकाराम सेवा मंडळ , वाघसाई.
*******
२५ मे
दुपारचे जेवण निलकंठ मंदिर खंडाळ. रात्री जेवण व मुक्काम यू केज रिसोर्ट खोपोली.
*******
२६ मे
दुपारचे जेवण महामार्ग (१० किमी ) रात्री जेवण व मुक्काम मौजे ठोम्बरेवाडी.
*******
२७ मे
दुपारचे जेवण आग्री शिक्षण प्रसारक मंडळ , खांदा कॉलोनी न्यू पनवेल. रात्री जेवण व मुक्काम भारती विद्यापीठ , सी बी डी.
बेलापुर.
*******
२८ मे
दुपारचे जेवण १० किमी वर , रात्री जेवण व मुक्काम श्रीकृषन हॉल , देवनार बस डेपो मागे. गोवंडी.
*******
2९ मे
दुपारचे जेवण १० की मि वर , रात्री जेवण व मुक्काम न्यू हनुमान थियेटर मंगल कार्यलय , चिवड़ा गल्ली , लाल बाग राजा गणपती जवळ
*******
३० मे
प्रस्थान राजभवन कड़े व पुढील निर्णय मा.खा श्री राजू शेट्टीजी घेणार.
COMMENTS