राज्यात शेतमालाला भाव नसून शेतकरी कधी नव्हे इतका संकटात सापडला आहे. कर्जमाफी देण्याची सरकारची नियत नसून आता सरकारला सामूहिक ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता नुसता पाठिंबाच नव्हे, तर त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरण्यास मी स्वतः तयार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
कर्जमाफीच्या तारखा सरकारने जाहीर केल्या. आता सरकारने दिवाळीची तारीख दिली आहे. तोपर्यंत वाट बघावी आणि कर्जमाफी झाली नाही तर ५ नोव्हेंबरला औरंगाबादला बैठक घेतली जाईल त्यानंतर राज्यात आंदोलन सुरू करणार असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
COMMENTS