कर्जमाफी नाकारणा-या सरकारला रुमण्याचा हिसका दाखवा – अजित पवार

कर्जमाफी नाकारणा-या सरकारला रुमण्याचा हिसका दाखवा – अजित पवार

जळगाव – शेतकरी प्रचंड अडचणीत असताना आणि दररोज शेतकरी आत्महत्या करत असतानाही सरकार सुस्त आहे. त्याला कर्जमाफीशी देणं घेणं नाही अशा या बैल सरकराला रुमण्याचा हिसका दाखवा अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला  फटकारलं. संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा कालपासून सुरु झाला. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर मध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी सरकावर सडकून टीका केली. कर्जमाफी झाल्याशिवाय एका मंत्र्याला  राज्यात फिरु देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. तुम्हाला कर्जमाफी देता येत नसेल तर तुम्ही बाजुला व्हा आम्ही कर्जमाफी देऊ असंही पवार म्हणाले.

COMMENTS