मुंबई – मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीला दिलेला शब्द फिरवला असल्याचा आरोप शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्यांनी केला आहे. दीड लाखांची मर्यादा खालून सरकारने शेतक-यांची फसवणूक केल्याचं सांगत, संपूर्ण कजर्माफीची मागणी असल्याचं सुकाणू समितीच्या नेत्यांनी सरकारला ठणकावलं आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधातला संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं सुकाणू समितीचे सदस्य डॉ. नवले यांनी स्पष्ट केलं. आधारभूत किमतीबद्दल सरकारनं काहीच ठोस सांगितलेलं नाही. त्यामुळे येत्या 9 जुलैपासून सरकारच्या या फसव्या कर्जमाफीविरोधात राज्यभरात यात्रा काढली जाणार आहे. नाशिकमधून 9 जुलैला सुरू होणारी यात्रा पुण्यात 23 जुलै संपणार आहे. सरकारने कर्जमाफीसंदर्भात घातलेल्या अटी काढून टाकाव्यात त्यासाठी त्यांना 25 जुलैपर्यंतचं अल्टिमेटम शेतकरी नेत्यांनी दिलं आहे. तोपर्यंत सरकारनं मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. सुकाणू समितीची काल मुंबईत कर्जमाफीविषयी चर्चा करण्यासाठी बैठक झाली त्यामध्ये हा इशारा देण्यात आला. राजू शेट्टी आणि बच्चू कडू हे कालच्या बैठकीला नव्हते, मात्र त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला होते.
COMMENTS