कर्जमाफी योग्य नाही पण……. – शरद पवार

कर्जमाफी योग्य नाही पण……. – शरद पवार

नाशिक – शेतक-यांच्या प्रश्नावर कर्जमाफी हा एकमेव पर्य़ाय नाही, त्यामुळे कर्जमाफी करणे हे योग्य नाही, मात्र कधीकधी ती द्यावीही लागते अशा शब्दात सध्याच्या काळात शेतक-यांना कर्जमाफी द्याला हवी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. राजकीय कारकिर्दिला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काल नाशिकमध्ये त्यांची प्रकट मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. शेती फायदेशीर ठरली आणि शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असंही पवार म्हणाले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सामुदायिक शक्ती उभी करणं गरजेचं आहे, शेती व्यवसायात 18 ते 20 टक्के शेतकरी आहेत तर ग्राहक 78 ते 80 टक्के आहेत त्यामुळे त्यांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकार घेतंय या शब्दात त्यांनी केंद्र सरकारच्या शेती धोरणावर टीका केली.

COMMENTS