कल्याणमध्ये महानगरपालिकेच्या परिसरात शिवसेना नगरसेवकाची नागरिकाला मारहाण

कल्याणमध्ये महानगरपालिकेच्या परिसरात शिवसेना नगरसेवकाची नागरिकाला मारहाण

अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार केल्याच्या वादातून कल्याणमध्ये शिवसेना नगरसेवकाने प्रभागातील एका नागरिकाला महापालिका आवारातच मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगलेंच्या प्रभागात अशोक शिंदे यांची टपरी होती. त्यावर कारवाई करत नगरसेवक उगलेंनी ती तोडली. यानंतर अशोक शिंदे यांनी उपोषण करत उगलेंच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी केली होती. याच रागातून अशोक शिंदेंना मारहाण करण्यात आली आहे.

मारहाणीनंतर अशोक शिंदे आणि शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी एकमेकांविरोधात बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नुकताच मनसेच्या माजी नगरसेविका मिनाक्षी डोईफोडे यांनी मोहन उगलेंविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर उगलेंवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

COMMENTS