काँग्रेस आर्थिक संकटात, पक्ष निधीसाठी आमदारांनी पगार देण्याचा प्रस्ताव

काँग्रेस आर्थिक संकटात, पक्ष निधीसाठी आमदारांनी पगार देण्याचा प्रस्ताव

केंद्र आणि राज्यात सत्तेतून पायउतार झालेल्या काँग्रेसची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. 15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर सत्तेतून पायउतार झाल्यामुळे काँग्रसपुढे आर्थिक संकटे वाढली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील सर्व आमदारांनी एका महिन्याचा पगार पक्षाला दान करावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र काँग्रेसने ठेवला आहे.

पक्षाचे निधी मिळण्याचे स्रोत कमी झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी त्यांचा एक महिन्याचा पगार ( 1 लाख 25 हजार ) पक्षाला दान करावा, असा प्रस्ताव आहे. यामुळे जवळपास 60 ते 70 लाख रुपये पक्षाच्या खजिन्यात जमा होतील. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांसंबंधी अंतिम निर्णय घेतील. पक्षाचा निधी उभारण्याचे स्रोत वाढवण्याला सध्या प्राधान्य देण्यात येत आहे’, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

 

COMMENTS