काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्यात ‘इंदू सरकार’चा शो बंद पाडला

काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्यात ‘इंदू सरकार’चा शो बंद पाडला

वादग्रस्त ठरलेला मधुर भांडारकरचा इंदू सरकार हा चित्रपट आज अखेर प्रदर्शित झाला. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्यातील चित्रपटाचे शो बंद पाडला.  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि गांधी घराण्याला बदनाम करणारा इंदू सरकार हा चित्रपट आहे, असा आरोप करत ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे शो बंद पाडला. तर काही ठिकाणी पोलीस बंदोबस्‍तात चित्रपट सुरू आहे. 

ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज कोरम मॉलमधील पहिला शो बंद पाडला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिकीट काढून सिनेमागृहात प्रवेश केला. चित्रपट सुरू होताच मधुर भांडारकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत चित्रपट बंद पाडला. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

इंदू सरकारमध्ये गांधी घराण्याची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी न्यायालयीन लढाई झाली. मात्र, न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्यानंतर आज इंदू सरकार चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित झाला आहे.

 

COMMENTS