चंद्रपूर:- जिल्ह्यातील चिमूर क्षेत्राचे भाजप आमदार कीर्ती भांगड़िया यांच्यावर चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यकर्त्यास मारहाण प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. दंड संहितेच्या 294, 143, 504, 506 या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
16 ऑगस्ट रोजी चिमूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते निषेधाचे फलक लावत होते. त्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आली होती. या याप्रकरणी भाजप आमदार कीर्ती भांगड़िया यांच्यावर चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाला आहे.
COMMENTS