काँग्रेस नेताच राहुल गांधींना म्हणाला ‘पप्पू’ आणि…..

काँग्रेस नेताच राहुल गांधींना म्हणाला ‘पप्पू’ आणि…..

काँग्रेस नेत्यानेच राहुल यांचा उल्लेख पप्पू म्हणून उल्लेख केला आहे.  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे विरोधक, टीकाकार  त्यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण उत्तर प्रदेशातील मेरठचे जिल्हाध्यक्ष विनय प्रधान यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राहुल गांधींचा पप्पू म्हणून उल्लेख केला. त्यामुळे पक्षनेतृत्वाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,’ काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी हे मध्य प्रदेशमधील मंदसोर येथे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावरूनच विनय प्रधान यांनी राहुल गांधी यांची प्रशंसा करत त्यांना सोशल मीडिया चक्क ‘पप्पू’ म्हणून त्यांचा उल्लेख केला. त्यांनी यावेळी म्हटले होते की,’ अदानी, अंबानी वा मल्ल्यांबरोबर हातमिळवणी करणे ‘पप्पू’ ला शक्य होते. मात्र तसे त्याने केले नाही. तसेच पंतप्रधान होणेही पप्पूला शक्‍य होते. मात्र तो पर्याय त्याने स्वीकारला नाही. त्याऐवजी मंदसौरला जाणे त्याने पसंत केले.

राहुल गांधींबद्दल अश्या शब्दाचा वापर करून विनय प्रधान यांनी पक्षाच्या घटनात्मक तत्त्वांची पायमल्ली केल्याचे कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण द्विवेदी म्हणाले. यानंतरच विनय प्रधान यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

 

COMMENTS