बेळगाव – सीमा भागातील मराठी भाषकांची गळचेपी करण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. कर्नाटकात कोणी जय महाराष्ट्र म्हणण्याला बंदी घालण्यास बंदी घालण्याचे संकेत कर्नाटकाच्या मंत्र्याने दिले होते. एखादा लोकप्रतिनिधी जय महाराष्ट्र म्हटला तर त्याचे पद रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावर कडी म्हणजे महाराष्ट्रातील ज्या बसेसवर जय महाराष्ट्र लिहिले आहे, त्या बसेसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरवर कर्नाटक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
जय महाराष्ट्र लिहिलेली बस काल बेळगावमध्ये दाखल होताच त्या बसचे ड्रायव्हर प्रमोद गायकवाड आणि कंडाक्टर देविदार मोरटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच त्यांचं स्वागत करण्यात आलेल्या स्थानिक मराठी भाषकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन भाषकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS