ठाणे – ठाण्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी शहर प्रमुख बाळकृष्ण पुर्णेकर यांची मृत्यूशी झुंज अखेर मंगळवारी पहाटे संपली. औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम संपवून परत येत असताना परवा अपघात झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर औरंगाबादच्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. विशेष म्हणजे पुर्णेकर यांचा आज वाढदिवस होता.
बाळासाहेब पुर्णेकर यांची शहरात एक स्वच्छ नेता म्हणून इमेज होती. त्यांच्या निधनाने ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याच अपघातात काँग्रेसचे सचिव संजय चौपाने यांचाही मृत्यू झाला होता.
COMMENTS