कावळा बसायला आणि फांदी मोडायला….. – गणेश नाईक

कावळा बसायला आणि फांदी मोडायला….. – गणेश नाईक

नवी मुंबई – नवी मुंबईमध्ये सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याच्या निर्णयानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे हे प्रकरण आपण मार्गी लावल्यांचं म्हणत आहेत. तर सिडकोच्या जमीनी फ्री होल्ड करण्याची मूळ मागणी आम्हीच केली होती.  सिडकोचे तत्कालिन प्रमुख संजय भाटिया आणि नगरविकास सचिव यांच्याकडे सादरीकरण केल्याचा दावा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी केला आहे.  आम्हाला याचे श्रेय घ्यायचे नाही, ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी ते खुशाल घ्यावे, मात्र कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ आली एवढच आपल्याला सांगायचं आहे असं म्हणत नाईक यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना टोला लगावलाय.

COMMENTS