काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदीच तोडगा काढू शकतात – मेहबूबा मुफ्ती

काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदीच तोडगा काढू शकतात – मेहबूबा मुफ्ती

या दलदलीतून केवळ पंतप्रधान मोदीच बाहेर काढू शकतात आणि तेच काश्मीर समस्येवर तोडगा काढू शकतात, असा आशावाद जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला आहे. काश्मीर समस्या सोडविण्यासाठी काश्मीर त्यांना संपूर्ण सहकार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.  

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती असे आहेत जे काश्मीरला या संघर्षग्रस्त दलदलीतून बाहेर काढू शकतात. त्यामुळे  मोदी जो निर्णय घेतील त्याला राज्यातील जनता पाठिंबा देईल.” असं मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हे मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संपूर्ण काश्मीर पाठिंबा देईल, असे सांगतानाच पूर्वीही अनेक पंतप्रधानांना पाकिस्तानात जायचे होते. पण त्यांची हिंम्मत झाली नाही. मोदी मात्र पाकिस्तानात गेले. मोदींच्या या हिंमतीला दाद द्यावीच लागेल, असे त्यांनी सांगून पंतप्रधान मोदी यांची मुक्तकंठाने स्तुती केली.

काश्मीरची स्थिती चांगली नाही. त्याचा परिणाम जम्मूवरही होत असतो. पण जम्मूत अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे तिथे पर्यटक येण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.

COMMENTS