कुलभुषण जाधव हे हेरगिरीसाठी पाकिस्तानात घुसले,अशा खोट्या आरोपाखाली त्यांना अटक करून,तसेच त्यांना बचावाची संधी न देता, पाक लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आज मुंबईच्या डबेवाल्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वाचवण्यासाठी भारत सरकारने अधिक आक्रमक होण्याची गरज आहे.सोबतच पाकिस्तानांवर आंतरराष्ट्रीय दबाव आणून कुलभुषण जाधव यांना परत आण्यासाठी भारत सरकारने तातडीची पावले उचलावीत अशी विनंती मुंबईचे डबेवाले केंद्र सरकारकडे केली आहे.
फाशीची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला काऊन्सिलर एक्सेस न देणे हे सिद्ध करतं की, जाधव यांचा कथित जबाब हा दबावाखाली घेण्यात आला. पाकिस्तानची पोलखोल होऊ नये म्हणूनच पाकिस्तान जाधव यांना कोणालाही भेटण्यास देत नाही. त्यामुळे पाकिस्तानची प्रवृत्ती समोर आली आहे. पाकिस्तान आणि भारताचे कायदे जवळपास एकसारखेच आहेत. जर एखादा आरोपी स्वतःच्या जबाबावर कायम न राहिल्यास दुस-या पक्षकाराला आरोपीच्या विरोधात पुरावे द्यावे लागतात. त्यामुळेच जाधव यांना जगासमोर आणलं जात नाही. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आतापर्यंत पाकिस्ताननं जाधव यांच्यासंदर्भात कोणत्याही माहितीची सार्वजनिकरीत्या भारतासोबत देवाणघेवाण केली नाही.
COMMENTS