कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रतिसाद उमटत असताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही याबाबत आपली प्रतिक्रीया दिली.
‘मोदी सरकारने हरप्रकारे प्रयत्न करुन, कुलभूषण जाधवांना परत आणावे’, असे ओवैसी म्हणाले. कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी, लोकसभेत आज विविध पक्षाच्या खासदारांनी आपआपली मते व्यक्त केली.
यावेळी ओवैसी म्हणाले, “मला या प्रकरणाचे राजकारण करायचे नाही. पाकिस्तानने कायदेभंग करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. आता कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवण्याला आपण प्राधान्य द्यायला हवे. कोणत्याही पुराव्याशिवाय जाधव यांना फाशीची शिक्षाची सुनावली गेली आहे. पुराव्याशिवाय पाकिस्तानचे नाटक सुरु आहे. मात्र कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणे हेच आपले ध्येय हवे”असेही ओवैसी म्हणाले.
COMMENTS