पाकिस्तानच्या कैदेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभुषण जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने तात्काळ प्रयत्न करावेत म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी तर्फे राज्यभर सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या निर्देशावरून राज्यभरात ही मोहिम राबवली जाणार असून सह्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देऊन राज्यातील लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत.
कुलभुषण जाधव यांच्यावर ते भारतीय गुप्तहेर संस्थेचे हेर असून हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानात घुसले अशा खोटया आरोपाखाली पाकिस्तान सरकारने अटक करून त्यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खटला भरला. जाधव यांना आपल्या बचावाची कुठलीही संधी न देता आंतररष्ट्रीय कायदा पायदळी तुडवून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अशोक चव्हाण यांनी पाकिस्तानचा निषेध करून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाचा हा निकाल मानवी हक्क आणि न्यायाच्या विरोधात आहे म्हटले आहे.
सरकारने अधिक आक्रमक होऊन नेमके व अधिक सक्रिय धोरण स्वीकारावे व आंतरराष्ट्रीय दबाव आणून जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. जनमानसाची व कॉंग्रेस पक्षाची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सह्यांची मोहीम राबवली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नागपूर येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली….
COMMENTS