कुलभूषण जाधव यांचा फाशीच्या शिक्षेविरोधात दयेचा अर्ज

कुलभूषण जाधव यांचा फाशीच्या शिक्षेविरोधात दयेचा अर्ज

रावळपिंडी – मूळचे सांगलीचे असलेले भारतीय नागरिक आणि पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपावरुन फाशीची शिक्षा झालेले कुलभूषण जाधव यांनी फाशीच्या शिक्षेविरोधात दयेचा अर्ज केला आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांकडे त्यांनी हा दयेचा अर्ज केला आहे. पाकिस्तानच्या मीडियातील वृत्तानुसार जाधव यांनी आपल्या दयेच्या अर्जात गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या कोर्टाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. यावर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख काय निर्णय देतात त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS