कुलभूषण जाधव यांचे पार्थिवच भारतात पाठवू, पाकिस्तानी हॅकर्स

कुलभूषण जाधव यांचे पार्थिवच भारतात पाठवू, पाकिस्तानी हॅकर्स

पाकिस्तानी हॅकर्सकडून अखिल भारतीय फुटबॉल संघटनेची वेबसाईट हॅक

पाकिस्तानी हॅकर्सनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे संकेतस्थळ हॅक केले आहे. संकेतस्थळ हॅक करत त्यावर कुलभूषण जाधव आणि भारतविरोधी पोस्ट टाकण्यात आली आहे.

पाकिस्तानी हॅकर्सने या साईटवर लिहिले की,’ आम्ही तुमची साईट का हॅक केली माहिती आहे का? तुम्हाला कुलभूषण जाधव परत हवे आहेत, हे शक्य नाही. आम्ही त्यांचे पार्थिव लवकरच पाठवू. तुम्हाला स्नॅपडील आणि स्नॅपचॅटमधील फरक कळत नाही अन् जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात.  असा संदेश पाकिस्तानी हॅकर्सनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तानी हॅकर्सने संकेतस्थळावर कुलभूषण जाधव यांचा फोटो आणि त्यासोबत फाशीचा फंदा टाकला आहे.

 

दरम्यान, अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने तांत्रिक कारणामुळे वेबसाईट बंद असल्याचे सुरवातीला ट्विट केले होते. परंतु नंतर त्यांना साईड हॅक झाल्याचे समजले. तसेच वेबसाईटवर कुलभूषण जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह संदेश लिहिले असल्याचेही कळले.

गेल्या महिन्यात दिल्ली विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी-दिल्ली , आयआयटी-बीएचयू , कोटा विद्यापीठ, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड टेक्नॉलॉजी, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट आणि नॅशनल एरोस्पेस लॅब्रोटोरीज अँड बोर्ड ऑफ रिसर्च इन न्युक्लिअर सायन्सेस यांच्या वेबसाईट पाक हॅकर्सनी हॅक केल्या होत्या. या शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करून त्यावर पाकिस्तान जिंदाबाद ही घोषणा टाकण्यात आली होती.

 

COMMENTS