केंद्रातील नव्या 9 मंत्र्यांची थोडक्यात ओळख !

केंद्रातील नव्या 9 मंत्र्यांची थोडक्यात ओळख !

  • शिवप्रताप शुक्ला –

शुक्ला हे राज्यसभेचे खासदार असून ते उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेचे ते 4 वेळा आमदार राहिलेले आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. ते पेशाने वकील आहेत. आणिबाणीच्या काळात त्यांनी 19 महिन्यांचा तुरुंगवास भोगला होता.

 

  • अश्विनीकुमार चौबे –

अश्विनीकुमार चौबे हे बिहारमधील बक्सरचे खासदार आहेत. चौबे हेही बिहारमध्ये सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडणू आले आहेत. बिहारमध्ये त्यांनी आरोग्य, नगरविकास अशी महत्वाची खाती 8 वर्ष सांभाळली आहेत. 70 च्या दशकात त्यांनी जेपींच्या आंदोलनात भाग घेतला होता. चौबे यांनी बीएससी झुलॉजीमध्ये केलं आहे.

 

  • विरेंद्र कुमार

मध्ये प्रदेशातील तिघामाघ या मतदारसंघातील विरेंद्र कुमार खासदार आहेत. ते सहा वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी एमए केलं आहे. तसंच बालकामगार या विषयात त्यांनी पीएचडी केली आहे. जेपी आंदोलनात  त्यांनी भाग घेतला असून त्यांना आणिबाणीमध्ये 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे.

  • अनंतकुमार हेगडे

अनंतकुमार हेगडे हे कर्नाटकातील उत्तर कनडा मतदारसंघाचे खासदार आहेत. सलग पाच वेळा ते लोकसभेवर निवडूण गेले होते. केवळ 28 व्या वर्षी ते खासदार झाले होते.

 

  • राजकुमार सिंग

बिहारमधील अराह या मतदारसंघाचे सिंह हे खासदार आहेत. ते माजी आयएएस अधिकारी आहेत. देशाचे गृहसचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विविध विभागचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी एमए केलं आहे. दिल्लीत सिंह यांचं शिक्षण झालं आहे.

 

  • हरदीपसिंह पुरी

पुरी हे माजी आयएफएस अधिकारी आहेत. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा याबाबत त्यांचा विषेश अभ्यास आहे. अनेक देशात त्यांनी भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे.

 

  • गजेंद्रसिंह शेखावत

राजस्थानातील जोधपूरचे खासदार आहेत. ग्रामिण विकास, खेळ याच्यामध्ये त्यांना  विशेष रूची  आहे. ऑल इंडिया लेवल बॉस्केटबॉल स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे. फिलॉसॉफीमध्य़े त्यांनी एमए आणि एमफील केलं आहे.

 

  • सत्यपाल सिंह

उत्तर प्रदेशातील बागपतचे खासदार आहेत. ते 1980 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईचे पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

 

  • अल्फोन्स कन्नाथानम्

माजी आयएएस अधिकारी आहेत. केरलमधली आहेत. दिल्लीत अतिक्रमणविरोधी कारवाईत त्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. अजून ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना राज्यसभेवर किंवा लोकसभेवर निवडूण यावे लागेल.

COMMENTS