केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात केंद्रातल्या काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार कालराज मिश्र, संजीव बलियान, उमा भारती राजीव प्रसाद रूडी, निर्मला सीतारमन यांना मंत्रिमंडळातू डच्चू मिळणार आहे. त्यांना पक्ष संघटनेत सामिल करुन घेतलं जाणार आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला असून भाजप अध्यक्ष अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत. तिथे त्यांच्यात बैठक सुरू झाली आहे. आज सकाळी शहा यांनी काही मंत्र्यांची बैठक घेतली होती.
COMMENTS