केंद्रात काय होणार याची सर्वांना चिंता आहे आणि आम्हाला मुंबईच्या आरोग्याची – उद्धव ठाकरे

केंद्रात काय होणार याची सर्वांना चिंता आहे आणि आम्हाला मुंबईच्या आरोग्याची – उद्धव ठाकरे

मुंबई – ’80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे ध्येय आमचं आहे. गेली 50 वर्ष आम्ही यावर चालतोय आणि म्हणून केंद्रात काय होणार याची सर्वांना चिंता आहे, मात्र आम्हाला मुंबईच्या आरोग्याची आहे.’ असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावेळी मुंबईत झालेल्या पावासात मृत्युमुखी पडलेल्यांना शिवसेनेकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

‘पाऊस सुरू झाला तर मेट्रोची कामं सुरू आहेत, मेट्रोची, रेल्वेची काही जबाबदारी आहे की नाही?’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.  ‘पंतप्रधान आवास योजना, म्हणजे काय ? आ वासून बघायचं, गरिबांना घर, कमी दरात घरं द्या मुंबईतल्या मिठाघराच्या जमिनीवर घरं बांधली जातात मग पुराचा धोका कायम आहे. नालेसफाई भ्रष्टाचार झाला असेल तर त्याला जरुर फासावर लटकवा. कचऱ्यात भ्रष्टाचार झाला असेल तर त्याला जरूर फासावर लटकवा. शिवसेनेचा या भ्रष्टयाचाराशी सूतरामही संबंध नाही.’ अशी तीव्र प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी दिली.

‘ पहिले धोकादायक इमारतीत राहाताहेत त्यांची व्यवस्था करा, मग आवास योजना करा.’ अशी टीका उद्धव ठाकरे  यांनी भाजपवर केली.

 

 

COMMENTS