केंद्रात भाजपनं शिवसेनेला काय दिली ऑफर ?

केंद्रात भाजपनं शिवसेनेला काय दिली ऑफर ?

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तरामध्ये शिवसेनेला काहीही कळवण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याचं कळतंय. मात्र भाजपनं शिवसेनेला लोकसभेतील उपसभापतीपद देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या डीएमकेचे थंबी दुराई हे उपसभापती आहेत. मात्र लवकरच त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांची जागा खाली होणार आहे. ती जागा शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र शिवसेनेला या उपसभापतीपदामध्ये रस नसल्याचं बोलंलं जातंय. त्याऐवजी त्यांना मंत्रीपद हवं आहे अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS