नवी दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जेटली यांच्या निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासह 8 केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. यामध्ये कलराज मिश्रा आणि निर्मला सितारमण यांचा समावेश आहे. एनआयने दिलेल्या वृत्तानुसार ही बैठक गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे.
जेटली यांनी आपण लवकरच संरक्षणमंत्रीपदाचा पदभार सोडू असं वक्तव्य केलं होतं. तसंच व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदावर निवड झाल्याने त्यांची जागाही रिकामी आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षीत आहे. या बैठती त्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या खात्यातही फेरबदल होण्याची शक्यता आहे.
COMMENTS