दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार परवा म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजता होणार आहे. या मंत्रिमंडळात जेडीयूचे दोन सदस्य मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जेडीयूचे लोकसभेत केवळ 4 सदस्य आहेत. असं असताना त्यांना केंद्रात दोन मंत्रीपदं आणि शिवसेनेचे लोकसभेत 18 सदस्य असताना त्यांना केवळ 1 मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे शिवेसनेच्या खासदारांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेला आणखी दोन मंत्रीपदे द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असल्यामुळे शिवसेनेला डावलता येणार नाही अशी भूमिका शिवसेना खासदारांनी घेतली आहे.
COMMENTS