केंद्रीय मंत्रिमडळचा विस्तार उद्या किंवा परवा  ? असे असू शकतात संभाव्य बदल !

केंद्रीय मंत्रिमडळचा विस्तार उद्या किंवा परवा  ? असे असू शकतात संभाव्य बदल !

दिल्ली – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या फेरबदलाचे वारे सध्या राजधानी दिल्लीत जोरात सुरू आहे. या फेरबदालमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीनेही काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुरेश प्रभू यांच्याकडील रेल्वेची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर सुरेश प्रभू यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

राजीव प्रताप रुडी यांनी कालच मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना पक्ष संघटनेत सामावून घेतलं जाण्याची शक्यता आहे. तर उमा भारती यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी तर्शविली आहे. प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगण्यात येतंय.

आरोग्य राज्यमंत्री फगनसिंग कुलिस्ते आणि कृषीराज्यमंत्री संजीव बलियान यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनुष्यबळ विकासमंत्री महेंद्र नाथ पांड्ये हेही राजीनामा देणार आहेत. त्यांची उत्तर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कलराज मिश्र हेही राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांचे वय 75 च्या पुढे आहे. त्यामुळे मंत्रिपदावरु त्यांना डच्चू मिळणार असून त्यांची कुठल्यातरी राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या दोन मंत्र्यांची वर्णी केंद्रात लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार रामचंद्र प्रसाद सिंग आणि संतोष कुशवाह यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. संरक्षणमंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे दिली जाते याबाबत अजून काही समजू शकलेले नाही. तर व्यंकय्या नायडू यांच्याकडील शहरी विकास मंत्रालय अनंतकुमार यांच्याकडे दिले जाऊ शकते. मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सकाळी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS