कॉंग्रेसचे आर.सी.घरत यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

कॉंग्रेसचे आर.सी.घरत यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशाची जबाबदारी स्विकारुन कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला. गेले सहा वर्ष आर.सी.घरत यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद होते.

कॉंग्रेसचे 18 उमेदवार  निवडणुक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत किमान दहा नगरसेवक निवडून येतील अशी अपेक्षा कॉंग्रेसला होती. मात्र, त्यामधून दोनच नगरसेवक निवडून आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे घरत यांनी राजीनामा सोपवला आहे.

COMMENTS