कोकणात गणेशोत्सवासाठी एसटी सोडणार 2216 जादा बसेस

कोकणात गणेशोत्सवासाठी एसटी सोडणार 2216 जादा बसेस

मुंबई – गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण… किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांसाठी  एसटीने तब्बल 2216 बसेसची सोय केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून 2216 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या असून येत्या 22 जुलै पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंगला सुरवात 15 जुलै पासून झाली असून परतीच्या ग्रुप बुकिंगची सुरुवात 23 जुलै पासून होत आहे. 20 ते 24 ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली कर्मचारी अहेरात्र कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘  ( ब्रेक डाउन व्हॅन ) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.

 

 

 

COMMENTS