नांदेड – नांदेड महापालिकेच्या निवडणुक जसजशी जवळ येत आहे तशी प्रचाराची रणधुमाळी जोर पकडत आहे. काल भाजपच्या प्रचारसभेत लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. अशोक चव्हाण यांची तुलना रावणाची केली. त्याला आज अशोक चव्हाण यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. कोण रावण ? कोण राम ? हे नांदेडची जनता ठरवेल असं अशोक चव्हाण म्हणाले.
नांदेडचा महापौर बाहेरचा मंत्री येऊन ठरवणार नाही तर नांदेडची जनताच महापौर ठरवेल असंही चव्हाण म्हणाले. कोणी कितीही दावे केले तरी नांदेडच्या महापौरपदावर काँग्रेसचाच उमेदवर बसेल असा विश्सासही त्यांनी व्यक्त केला. सध्या उमेदवार निवडीवर पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे योग्य वेळी कोण काय बोलतंय याचा समाचार घेऊ असंही अशोक चव्हाण म्हणाले. मात्र टीका करताना आम्ही आमची पातळी सोडणार नाही असंही ते पुढे म्हणाले.
COMMENTS